नगरपालिकेचे दोन शिक्षक पुरस्काराने सन्मानित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नगरपालिकेचे दोन शिक्षक पुरस्काराने सन्मानित
नगरपालिकेचे दोन शिक्षक पुरस्काराने सन्मानित

नगरपालिकेचे दोन शिक्षक पुरस्काराने सन्मानित

sakal_logo
By

अंबरनाथ, ता. २१ (बातमीदार) : अंबरनाथ नगरपालिका शाळेचे मुख्याध्यापक श्रीराम जोशी तसेच शिक्षिका रोहिणी बुधवंत यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अंबरनाथ नगरपरिषदेच्या शिक्षण विभागातर्फे नुकतेच वार्षिक स्नेहसंमेलन पार पडले. अतिरिक्त मुख्याधिकारी डॉ. प्रशांत शेळके यांच्या हस्ते शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी गजानन मंदाडे यांच्या उपस्थितीमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच नगरपरिषदेच्या यूपीएससी भवनात झाले. पालिकेच्या सर्व शाळांनी यामध्ये सहभाग घेतला होता. शाळा क्रमांक एकचे मुख्याध्यापक श्रीराम जोशी आणि शाळा क्रमांक १६ च्या शिक्षिका रोहिणी बुधवंत यांना आदर्श शिक्षक पुरस्कार; तर खुंटवली येथील शाळा क्रमांक पाचला आदर्श शाळा आणि प्रत्येक शाळेतील दोन विद्यार्थ्यांना आदर्श विद्यार्थी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वर्षभरात पार पडलेल्या वेशभूषा, समूहगान, चित्रकला आदी विविध स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे पारितोषिक वितरण करण्यात आले. नगरपरिषद शिक्षण विभागाचे सर्व केंद्र समन्वयक, मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी कार्यक्रम यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.