मुलुंडमध्ये राजकिरीटचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुलुंडमध्ये राजकिरीटचे आयोजन
मुलुंडमध्ये राजकिरीटचे आयोजन

मुलुंडमध्ये राजकिरीटचे आयोजन

sakal_logo
By

मुलुंड, ता. २१ (बातमीदार) ः महाराष्ट्र सेवा संघ आणि क्रिसेंट थिएटर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘दशावतारी राजकिरीट’ या नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे. मुलुंड येथील सु. ल. गद्रे सभागृहात हे नाटक २७ मार्च रोजी ६ः३० ते ८ः३० च्या दरम्यान होईल. या नाटकाला स्वेच्छा मूल्य प्रवेश आहे; तरी सर्व रसिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्र आणि सर्जनशाळ यांनी या नाटकाची निर्मिती केली आहे. या नाटकाचे दिग्दर्शन, लेखन विशाल गावडे यांनी केले असून संगीत दिग्दर्शन जयदीप कोडोलीकर, शुभम साने यांचे आहे. रंगभूषा मयुरेश माळवदे; तर वेशभूषा विलास गावडे यांची आहे.