मुलुंडमध्ये ‘हाथ से हाथ जोडो’ अभियान

मुलुंडमध्ये ‘हाथ से हाथ जोडो’ अभियान

मुलुंड, ता. २१ (बातमीदार) ः ‘हाथ से हाथ जोडो’ या अभियानांतर्गत काँग्रेस पक्षाच्या वतीने घरोघरी जाऊन जनजागृतीचे अभियान राबवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर येथील संजय गांधीनगरमध्ये जनजागृती करण्यात आली.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेनंतर हाथ से हाथ जोडो हे अभियान काँग्रेस राबवत आहे. मुलंडमध्ये काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी हे अभियान सुरू केले आहे. या वेळी सचिन सिंग, राकेश राघवन, अरविंद यादव, संतोष सोनवणे, मुंबई काँग्रेसचे उपाध्यक्ष गोविंद सिंग, सरचिटणीस सुनील गंगवानी, उपाध्यक्ष डॉ. बाबुलाल सिंग, सचिव किशोर मुंडेकल, प्रवक्ते भरत सोनी यांच्यासह काँग्रेस नेते कैलास पाटील, राजेश इंगळे, अश्विनी पोचे, भगवान किशोर तिवारी, मोझेस पीटर, निक्सन, राकेश नागर, अनिल सिंग यांच्यासह अनेक मान्यवरांनी यात सहभाग घेतला. घरोघरी जाऊन महागाई, बेरोजगारी या मुद्द्यांकडे या वेळी लक्ष वेधण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com