‘गुरू प्रवास’ पुस्तकाचे लोकार्पण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘गुरू प्रवास’ पुस्तकाचे लोकार्पण
‘गुरू प्रवास’ पुस्तकाचे लोकार्पण

‘गुरू प्रवास’ पुस्तकाचे लोकार्पण

sakal_logo
By

वडाळा, ता. २२ (बातमीदार) ः मुख्याध्यापक सूर्यकांत वीरकर यांच्या गुरू महिमेवर आधारित चौथे पुस्तक ‘गुरू प्रवास’चे लोकार्पण रविवारी (ता. १९) झाले. बृहन्मुंबई महापालिका शिक्षण एफ. उत्तर विभागांतर्गत वडाळ्यातील कोरबा मिठाकर सभागृहात हा कार्यक्रम पार पडला.

या कार्यक्रमात एम पूर्व वार्डचे पूर्व प्रशासकीय अधिकारी सुदाम चव्हाण, वरिष्ठ शिक्षिका सुवर्णा नाटलकर, मुख्याध्यापक किशोर जाधव, प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त पूर्व विभाग निरीक्षिका प्रीती पाटील, एफ उत्तर विभाग वरिष्ठ विभाग निरीक्षक जगदीश गायकवाड, स्वामी विवेकानंद पॉलिटेक्निक कॉलेज चेंबूरचे प्राध्यापक हिरा राखुंडे, वडाळा ज्ञानेश्वर विद्यालय मुख्याध्यापक विजयकुमार धुमाळ आदी शिक्षक व मान्यवर उपस्थित होते.