आयआयएफएल जितो अहिंसा रनचे आयोजन

आयआयएफएल जितो अहिंसा रनचे आयोजन

गोरेगाव, ता. २२ (बातमीदार) : जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनकडून (जितो) टॉरेंट ग्रुपद्वारा संचलित ‘आयआयएफएल जितो अहिंसा रन’चे आयोजन २ एप्रिल रोजी करण्यात येत आहे. शांतता व अहिंसा या मूल्यांचा प्रचार करणे हा यामागील हेतू असल्याचे सांगितले जात आहे. यात भारतातील ६५ शहरामध्ये आणि २० आंतरराष्ट्रीय ठिकाणी एकाच वेळी हजारो धावपटू सहभागी होतील. अहिंसेसाठी अनेक ठिकाणी धावणाऱ्या सर्वाधिक धावपटूंसाठी ही रन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, वर्ड रेकॉर्डस् इंडिया आणि लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवण्याची अपेक्षा आहे.

जितो मुंबई झोनचे अध्‍यक्ष पृथ्‍वीराज कोठारी, जितो मुंबई झोनचे उपाध्‍यक्ष महेंद्र जैन आणि जितो मुंबई झोनचे प्रमुख सचिव विनय जैन यांनी जितो मुंबई हाफ मॅरेथॉन जर्सीचे अधिकृत अनावरण केले. प्रख्‍यात उद्योगपती, सामाजिक व्‍यक्‍ती आणि जितो मुंबईमधील प्रमुख मान्‍यवरांनी उपस्थिती राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
याप्रसंगी जितो मुंबई झोनचे अध्यक्ष पृथ्वीराज कोठारी म्हणाले की, उन्नत जगासाठी शांतता, अहिंसा, प्रेम आणि एकात्मतेची जाणीव पसरवण्याच्या उद्देशाने मुंबईत ‘आयआयएफएल जितो अहिंसा रन’ आयोजित करताना आम्हाला आनंद होत आहे. आजच्या अशांत काळात फक्‍त शारीरिक अहिंसाच नव्हे, तर मानसिक अहिंसेच्या तत्त्वांचेदेखील कौतुक करण्याची आणि अंगीकारण्याची गरज आहे. पहिल्यांदाच हजारो क्रीडाप्रेमी, व्यावसायिक धावपटू, नवोदित, गृहिणी, मुले आणि सर्व स्तरातील लोक शांततेप्रती धावण्यासाठी एकत्र येणार आहेत; तर उपाध्यक्ष महेंद्र जैन म्हणाले की, नियमित रनच्‍या तुलनेत अहिंसा रनचा सखोल अर्थ आहे. या अनोख्या उपक्रमाद्वारे आम्ही सर्व भारतीयांना आणि जगभरातील लोकांना शांती, सहानुभूती व अहिंसेच्या समान हेतूने एकत्र आणण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, जे भगवान महावीरांच्या महान प्रतिपादनांपैकी एक आहे.
---
‘जितो’बाबत
जितो (जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन) ही व्यावसायिक, उद्योगपती, ज्ञानी कामगार आणि व्यावसायिकांची जागतिक संघटना आहे. जी नैतिक व्यवसाय पद्धतीचे वैभव प्रतिबिंबित करते. सामाजिक-आर्थिक सक्षमीकरण, मूल्य-आधारित शिक्षण, समुदाय विकास, करुणा आणि जागतिक मैत्री यांना प्रोत्साहन देण्यासाठी संस्थेची स्थापना करण्यात आली. जितो ३५,००० हून अधिक सदस्यांसह समाजातील सर्व घटकांचे प्रतिनिधीत्व करते. ज्यात ९००० हून अधिक तरुण आणि ९००० हून अधिक महिलांचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com