आझाद मैदानात आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आझाद मैदानात आंदोलन
आझाद मैदानात आंदोलन

आझाद मैदानात आंदोलन

sakal_logo
By

मानधनासाठी शिक्षिकांचे भरउन्हात आझाद मैदानात आंदोलन
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमचा पाडवा गोड करावा

मुंबादेवी, ता. २१ (बातमीदार) ः मानसेवी शिक्षकांचे वेतन ९ महिन्यांपासून प्रलंबित आहे. ते तत्काळ मिळावे. मानसेवी शिक्षकांना माध्यमिक शिक्षकांचा दर्जा देण्यात यावा. मानसेवी शिक्षकांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे आदी मागण्यांसाठी आझाद मैदानांवर आंदोलन सुरू आहे. पाडव्याच्या मुहूर्तावर तरी या मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी शिक्षक करत आहेत. वंदना लोणकर, वंदना विटकर, तुषार देशमुख, अश्विनी कडू यांच्यासह असंख्य शिक्षक यात उपस्थित आहेत.

महाराष्ट्र शासन अल्पसंख्याक विभागाकडून मागील १४ वर्षांपासून मराठी भाषा फाऊंडेशन वर्ग ही योजना अमराठी माध्यमांच्या शाळेत राबवण्यात येत आहे. इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना मराठी भाषेचे ज्ञान देण्यासाठी, स्पर्धा परीक्षेत विद्यार्थी टिकून राहण्यासाठी ही योजना राबवण्यात आली आहे. सदर योजनेअंतर्गत मानधन तत्त्वावर सुरुवातीला २००८ मध्ये कंत्राटी शिक्षक म्हणून ५००० हजार रुपये मानधन देण्यात आले. त्यामध्ये ११ महिन्यांची नियुक्ती करण्यात येत होती. या शिक्षकांना १४ वर्षांपासून सेवा संरक्षण मिळालेलेच नाही, अशी तक्रार तुषार देशमुख यांनी केली आहे.

मराठी भाषा राज्य सरकार अमराठी शाळांमध्ये अनिवार्य करीत आहे. मराठी भाषा संवर्धनासाठी कार्यरत असणाऱ्या मानसेवी शिक्षकांना मराठी माध्यमांच्या शिक्षकांच्या सम नियमावलीत समाविष्ट करून घेण्यात यावे. ज्याप्रमाणे आदिवासी विकास विभागातील १० वर्षे सेवेत असणाऱ्या शिक्षकांना कायम केले. त्याचप्रमाणे अल्पसंख्याक विकास विभाग मंत्रालय यांच्याकडून सुरू असलेल्या मराठी भाषा फाऊंडेशन वर्ग शिक्षकांना सेवेत सामावून घेण्यात यावे, अशी मागणी अश्विनी कडू यांनी केली आहे.