जिल्‍हा परिषद घेणार मालमत्तांचा शोध

जिल्‍हा परिषद घेणार मालमत्तांचा शोध

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २१ : जिल्हा परिषदेच्या मालकीच्या कोट्यवधी रुपयांच्या जागा, मालमत्ता हातच्या जाऊ नयेत आणि ज्या जागांवर अतिक्रमण झाले आहे, त्या ताब्यात घेण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार सेवानिवृत्त अधिकारी व तज्‍ज्ञांची एक समिती गठित करण्यात येणार असून, या समितीद्वारे शोध घेऊन मालमत्ता कागदपत्रांचे अद्ययावतीकरण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या सूत्रांनी दिली.
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेला सोयीसुविधा पुरवण्याबरोबरच त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे कामदेखील करीत असते. जिल्हा परिषदेच्या मालकीच्या शहर व तालुक्यांच्या ठिकाणी तसेच ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर जागा, मालमत्ता आहेत. या जागांवर अथवा मालमत्तांवर अनेक ठिकाणी अतिक्रमण केल्यामुळे संबंधित मालमत्तांची कागदपत्रेच सापडत नाहीत. त्यामुळे प्रशासनाची अडचण होते. या जागांवर अतिक्रमण झाल्यामुळे जिल्हा परिषदेच्या महसुलावरदेखील परिणाम होत आहे. याची दखल घेत ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांनी कंबर कसली असून, जिल्हा परिषदेच्या मालमत्तांचा शोध घेण्याचे आदेश दिले. या मालमत्ता शोधून त्यांच्‍या कागदपत्रांचे अद्ययावतीकरण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी महसूल व नगररचना विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची एक समिती नियुक्ती करण्याच्या सूचनादेखील संबंधित विभागाला दिल्या आहेत. या समितीच्या माध्यमातून या जागा परत मिळवण्यासाठी आणि ज्या आहेत त्या वाचविण्यासाठी प्रत्येक मालमत्तेची संचिका बनविण्यात येणार आहेत. प्रत्येक मालमत्तेचे मोजमाप करणे, नकाशा तयार करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
...................................
कोट :-
ठाणे जिल्हा परिषदेच्या मालमत्तांचा शोध समितीच्या माध्यामतून घेण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या मालकीच्या असलेल्या व अतिक्रमण झालेल्या जागा परत मिळवण्यासाठी आणि ज्या आहेत त्या वाचविण्यासाठी प्रत्येक मालमत्तेच्या कागदपत्रांचे अद्ययावतीकरण करण्यात येणार आहे.
- संदीप चव्हाण, कार्यकारी अभियंता, सा. बां. जि. प. ठाणे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com