Wed, June 7, 2023

पोलिस निरीक्षक रुपाली दांगट यांचा गौरव
पोलिस निरीक्षक रुपाली दांगट यांचा गौरव
Published on : 21 March 2023, 11:49 am
मुलुंड, ता. २१ (बातमीदार) ः मुलुंड नवघर पोलिस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक रूपाली दांगट यांचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल नुकताच सन्मान करण्यात आला. मुलुंड पूर्वेतील समर्पण संस्थेच्या योगिनींनी वीर संभाजी सांस्कृतिक भवन येथे हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमामध्ये रूपाली दांगट यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी मोठ्या प्रमाणावर महिलांनी गर्दी केली होती.