Sun, June 4, 2023

मुलुंडमध्ये नववर्षाचे स्वागत
मुलुंडमध्ये नववर्षाचे स्वागत
Published on : 21 March 2023, 12:08 pm
मुलुंड, ता. २१ (बातमीदार) ः नववर्ष स्वागतयात्रा समिती मुलुंड यांच्या वतीने नववर्ष आणि गुढी पाडव्याच्या निमित्ताने मुलुंडमध्ये मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. ही मिरवणूक मुलुंड पूर्वेतील ज्येष्ठ नागरिक संघ, विरंगुळा केंद्र येथून बुधवारी सकाळी ७ वाजता निघणार आहे. या मिरवणुकीच्या मार्गावर संस्कार भारतीच्या रांगोळ्या तसेच घोडेस्वार, महिला लेझीम पथके, महिला बाईक रॅली, ढोल पथक, चित्ररथ, पालखी तसेच भजनी मंडळी आदींचा समावेश असेल. याचा समारोप तुंगवतेश्वर मंदिर मुलुंड पूर्व येथे होणार आहे. तरी सर्व नागरिकांनी वेळेवर उपस्थित राहून स्वागत यात्रेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.