वडाळ्यात बेस्टच्या ट्रान्सफॉर्मरला आग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वडाळ्यात बेस्टच्या ट्रान्सफॉर्मरला आग
वडाळ्यात बेस्टच्या ट्रान्सफॉर्मरला आग

वडाळ्यात बेस्टच्या ट्रान्सफॉर्मरला आग

sakal_logo
By

वडाळा, ता. २१ (बातमीदार) ः वडाळा पूर्व शांती नगर मार्केट येथील बेस्टच्या ट्रान्सफॉर्मरला मोठी आग लागल्याची घटना सोमवारी (ता. २०) रात्री ९.३० च्या दरम्यान घडली. परिसरात आगीचे लोट पाहून लोकांची धावपळ उडाली होती; तर घटनेची माहिती मिळताच वडाळा टीटी पोलिस, वडाळा आणि अँटॉप हिल येथील अग्निशमन दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. शर्थीच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले.
बृहन्मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन विभागाचे आपदा मित्र आशिष गायकवाड, संपत जैस्वाल व टीमने विशेष सहकार्य केले. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाच वर्तवण्यात आला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही; मात्र ऐन परीक्षेच्या काळात बेस्टच्या ट्रान्सफॉर्मरला आग लागल्याने विभागात विद्युत पुरवठा खंडित झाला. विद्युत पुरवठा सुरळित होण्यासाठी साधारण दोन दिवसांचा कालावधी लागणार असल्याची माहिती बेस्ट कर्मचाऱ्यांनी दिली आहे.