ठाण्यात रेखाटणार दहा हजार फूटांची रांगोळी

ठाण्यात रेखाटणार दहा हजार फूटांची रांगोळी

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २१ : चैत्रशुद्ध प्रतिपदा-गुढीपाडव्याच्या निमित्ताने भाजप ठाणे शहरच्या वतीने ‘जी-२०''या विषयावर समर्पित चित्र प्रदर्शन भरवण्यात आले आहे. ‘संस्कार भारती''च्या कोकण प्रांत ठाणे जिल्हा समितीच्या वतीने गावदेवी मैदानात दहा हजार चौरस फूटाची भव्य रांगोळी रेखाटली जाणार आहे. ठाण्यातील विद्यार्थी व नागरिकांनी प्रदर्शन व रांगोळी पाहण्यासाठी आवर्जून भेट देऊन जी-२० शिखर परिषदेसंदर्भातील माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन भाजपचे आमदार व ठाणे शहराध्यक्ष निरंजन डावखरे यांनी केले आहे. भारतात होणाऱ्या या शिखर परिषदेच्या निमित्ताने २० देशातील वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक प्रतिनिधी भारत भेटीवर येत आहेत. याच विषयाला समर्पित असलेली ‘संस्कार भारती''तर्फे दिव्य रांगोळी काढली जाईल. तसेच भाजप ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीने एक चित्र प्रदर्शन मांडण्यात येणार आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून जी-२० शिखर परिषद व सहभागी २० देशांच्या गटाबद्दल तपशीलवार माहिती या प्रदर्शनामध्ये उपलब्ध होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com