चेतन ठाकरे आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चेतन ठाकरे आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित
चेतन ठाकरे आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

चेतन ठाकरे आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

sakal_logo
By

विक्रमगड, ता. २२ (बातमीदार) : सामाजिक क्षेत्रात भरीव काम करणाऱ्या भागीरथी भोईर सामाजिक प्रतिष्ठान संस्थेचा देदीप्यमान स्नेहसोहळा भाऊसाहेब वर्तक हॉल विरार येथे पार पडला. या राज्यस्तरीय पुरस्कारामध्ये प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा माण येथील माध्यमिक शिक्षक तसेच मोहो खुर्द गावचे चेतन ठाकरे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक रत्न या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी भक्ती शिंदे, संस्थेचे अध्यक्ष दिनेश भोईर, सचिव अंकुश भोईर, शिक्षक चेतन ठाकरे यांचे कुटुंबीय उपस्थित होते.