तलासरीत ५१ जोडप्यांचा विवाहसोहळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तलासरीत ५१ जोडप्यांचा विवाहसोहळा
तलासरीत ५१ जोडप्यांचा विवाहसोहळा

तलासरीत ५१ जोडप्यांचा विवाहसोहळा

sakal_logo
By

कासा, ता. २२ (बातमीदार) : तलासरी तालुक्यातील विश्व हिंदू परिषदेच्या वनवासी कल्याण केंद्रात ५१ आदिवासी जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. लायन्स क्लब ऑफ डोंबिवलीतर्फे दरवर्षी पालघर जिल्ह्यातील तलासरी या ग्रामीण भागात आदिवासी सामूहिक विवाह सोहळा हा उपक्रम राबवण्यात येतो. आतापर्यंत ५०० हून अधिक जोडप्यांचे विवाह लावून त्यांना स्वतःच्या पायावर सक्षमरित्या उभे केले आहे. यंदाचे उपक्रमाचे १०वे वर्ष असल्याने हा सोहळा नेहमीपेक्षा भव्य आणि डोळे दीपवणारा होता.
प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही एकूण ५१ पेक्षा जास्त आदिवासी जोडप्यांची सामूहिक विवाह समारंभ तलासरी येथील वनवासी कल्याण केंद्रात पार पडला. फक्त विवाह लावून न देता, जोडप्यांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन सर्व नवविवाहित जोडप्यांना पुढील संसारासाठी लागणारी सर्व गृहोपयोगी सामग्रीदेखील क्लबतर्फे भेट म्हणून देण्यात आली. लग्नातील सर्व विधी, सर्व सामग्री, शास्त्रोक्त पद्धतीने कार्यक्रमाची आखणी, सर्व जोडप्यांच्या कुटुंबीयांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती आणि अन्य मान्यवरांच्या साक्षीने हा सोहळा अत्यंत चांगल्या रीतीने पार पडला.
या वेळी लायन्स क्लब ऑफ डोंबिवलीचे सभासद विनोद ओरपे, परणाद मोकाशी उपस्थित होते. तसेच जिल्हा, विभागीय व झोनमधील सर्व लायन्स क्लब व त्यांचे पदाधिकरी आणि सदस्य, वनवासी कल्याण केंद्र, तलासरीचे सर्व पदाधिकारी, सर्व प्रायोजक, हितचिंतक, आदिवासी जोडपी व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. लायन्स क्लब ऑफ डोंबिवलीच्या सर्व सदस्यांच्या परिश्रमाने आणि मधुकर चक्रदेव यांच्या नेतृत्वाने या वर्षीचा आदिवासी सामूहिक विवाह सोहळा यशस्वीरीत्या पार पडला.