Thur, June 1, 2023

सांडू मार्गावरील वाहनांवर कारवाईची मागणी
सांडू मार्गावरील वाहनांवर कारवाईची मागणी
Published on : 21 March 2023, 11:39 am
चेंबूर, ता. २१ (बातमीदार) ः चेंबूर येथील सांडू मार्गावरील मोनो रेल्वे स्थानकाजवळ वाहनचालक आपली वाहने उभी करत आहेत. त्यामुळे नागरिक व वाहनचालकांना वाहने चालवताना त्रास होत आहे. या वाहनांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
चेंबूर येथील सांडू मार्गावर मोनो रेल्वे स्थानक, तसेच मोठ्या प्रमाणात अनधिकृत फेरीवाले यांनी बस्तान मांडले आहे. संध्याकाळी तर हे फेरीवाले मार्गावर गाड्या उभ्या करतात. तसेच या मार्गाच्या बाजूला खरेदीकरिता आलेले वाहनचालक व मालक आपली वाहने मार्गाच्या मधोमध लावून जातात. त्याचा नाहक त्रास इतर वाहनचालक व नागरिकांना होत आहे. वाहतूक पोलिसांनी लक्ष घालून ही वाहने त्वरित हटवावीत व मार्गावर वाहने उभी करू देऊ नयेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.