ठाणेकरांची यंदाही करवाढीतून सुटका ठाणेकरांची यंदाही करवाढीतून सुटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाणेकरांची यंदाही करवाढीतून सुटका
ठाणेकरांची यंदाही करवाढीतून सुटका
ठाणेकरांची यंदाही करवाढीतून सुटका ठाणेकरांची यंदाही करवाढीतून सुटका

ठाणेकरांची यंदाही करवाढीतून सुटका ठाणेकरांची यंदाही करवाढीतून सुटका

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २१ : कोणतीही करवाढ व दरवाढ नसलेला ठाणे महापालिकेचा २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा ४ हजार ३७० कोटी रुपयांचा अर्थसकल्प पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी मंगळवारी मंजूर केला. उत्पन्नाची जाणीव ठेवत भांडवली आणि महसुली खर्चात काटकसर, दर्जेदार विकासकामे आणि सोयी-सुविधांवर भर देण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पात आहे. विशेष म्हणजे ठाणेकर मुख्यमंत्र्यांना अपेक्षित असलेले स्वच्छ, सुंदर, खड्डेमुक्त शहर साकारणारा आणि आरोग्य, शिक्षणावर भर देणारा हा अर्थसंकल्प आहे.
ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पावर गेली दोन वर्षे कोरोनाचे सावट होते. कोव्हिडमुळे उत्पन्न घटल्याने आणि अनुदानही रखडल्याने ठाणे महापालिकेच्या तिजोरीवर भार येत होता. परिणामी सलग दोन वर्षे कोणतेही नवीन प्रकल्प हाती न घेता काटकसरीचे वास्तववादी अर्थसंकल्प सादर करण्यात आले; मात्र यंदा कोव्हिडचे ढग दूर झाले आहेत. याशिवाय मुख्यमंत्री स्वत: ठाणेकर असल्याने राज्य व केंद्रातून मिळणाऱ्या निधीच्या जोरावर शहरांमध्ये पुन्हा एकदा हायटेक प्रकल्पांचा धडका लागेल, अशी अपेक्षा व्यक्त होती, पण कोट्यवधींची उड्डाणे घेणाऱ्या प्रकल्पांचे स्वप्न दाखवण्याऐवजी मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे अभियानावरच लक्ष केंद्रित करणारा अर्थसंकल्प पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सादर केला आहे.
२०२२-२३ मध्ये ३ हजार ३८४ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प तत्कालीन पालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी सादर केला होता. या मूळ अर्थसंकल्पात सुधारणा करून आयुक्त अभिजित बांगर यांनी शिलकेसह सुधारित २०२२-२३ चा ४ हजार २३५ काटी ८३ लाखांचा; तर २०२३-२४ मध्ये आरंभीच्या शिल्लकीसह मूळ अंदाज ४ हजार ३७० कोटींचा अर्थसंकल्प मंजूर केला आहे. पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी ठाणेकरांवरील करवाढ टळली होती. यंदाही कोणत्याही प्रकारचा कराचा बोजा ठेवण्यात आला नसल्याने ठाणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. खर्च आणि उत्पन्नाचा ताळमेळ बसवताना महसुली उत्पन्नवाढीवर भर आणि खर्चामध्ये वित्तीय शिस्त, अनावश्यक महसुली खर्चात कपात करण्याचा मानस आयुक्तांनी व्यक्त केला आहे.


---
जमेचा रुपया
तपशील जमा रक्कम रुपया हिस्सा (पैशांत)

महापालिका स्वउत्पन्न १८४५.८७ ४२
वस्तू व सेवा कर, मुद्रांक शुल्क, व्यपगत अनामत १३४१.२९ ३०
आरंभीची शिल्लक ६९९.७९ १६
इतर अनुदाने व कर्जरोखे ५१०.०५ १२
एकूण जमा ४३७०.०० १००

...............................
खर्चाचा रुपया
तपशील खर्च क्कम रुपया हिस्सा (पैशांत)

भांडवली खर्च १६६०.९१ ३८
वेतन व भात्त्यांवरील खर्च १२५०.४४ २९
यंत्रणा चालवणे व त्यासाठी खरेदी ७४२.५६ १७
परिवहन उपक्रमास निधी २३०.०० ०५
देखभाल व दुरुस्ती १८७.४८ ०४
प्रशासकीय व इतर खर्च १५६.०१ ०४
विविध योजनांवरील खर्च १४२.६० ०३
एकूण खर्च ४३७०.०० १००