चेकडॅममुळे आदिवासींच्या चेहऱ्यावर आनंद

चेकडॅममुळे आदिवासींच्या चेहऱ्यावर आनंद

कासा, ता. २१ (बातमीदार) : अदाणी फाऊंडेशनच्या पुढाकाराने अदाणी इलेक्ट्रिसिटी डहाणू औष्णिक ऊर्जा केंद्राच्या १०० कर्मचाऱ्यांनी उभारलेला चेक डॅम कैनाड-कडूपाडा आदिवासींसाठी वरदान ठरला आहे. सिमेंटच्या रिकाम्या पिशव्यांमध्ये रेती आणि दगड भरून वापरण्यात आलेल्या या चेक डॅममुळे डहाणू परिसरातील कैनाड-कडूपाडा गावाची भूगर्भ जलपातळी उंचावत असून पिण्याच्या पाण्याव्यतिरिक्त अन्य वापरासाठीच्या पाण्याची उपलब्धतता वेगाने वाढली आहे.
कैनाड-कडूपाडा याव्यतिरिक्त जवळच्या कैनाड, देहाने, पाले, घडणे, वनकस आणि सोनाळे या डहाणू तालुक्यातील आठ गावांमध्ये तीन हजार रिकाम्या सिमेंट पिशव्यांच्या मदतीने आठ चेक डॅम बांधण्यात आले आहेत. यामुळे गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदा पसरला आहे. उन्हाळ्यात पाण्याची पातळी खालावते, त्यामुळे गावकऱ्यांना या चेक डॅमद्वारे पाण्याची मुबलक प्रमाणात सोय झाली. याचे आयोजन डहाणू तालुका कृषी विभागाच्या मदतीने करण्यात आले.

---------------------
आम्हाला आधी केवळ पावसाळ्यातच पाणी मिळायचे. अदाणी डहाणू औष्णिकऊर्जा केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी चेक डॅम बांधल्यानंतर आम्हाला मे अखेरपर्यंत पाण्याचा उपयोग होईल. हे पाणी गुरांना पिण्यासाठी आणि इतर दैनंदिन घरगुती कामासाठीदेखील वापरता येऊ शकते. या उपक्रमामुळे आम्हाला जवळपासच्या भागात अधिक बंधारे बांधण्यासाठी प्रेरणा मिळाली.
- दशरथ भोंजर, ग्रामस्थ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com