मिरा रोडमध्ये रंगणार चैत्र नवरात्रौत्सव

मिरा रोडमध्ये रंगणार चैत्र नवरात्रौत्सव

भाईंदर, ता. २१ (बातमीदार) : मिरा रोड येथील बेवर्ली पार्क परिसरातील नामदार गोखले मैदानात आमदार प्रताप सरनाईक फाऊंडेशनच्या वतीने चैत्र नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. देवीची भक्ती, उपासना करण्याबरोबरच २२ ते ३१ मार्चदरम्यान विविध सांस्कृतिक-धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन याकाळात करण्यात आले आहे. जेजुरी गडाचा देखावा हे या उत्सवाचे आकर्षण असणार आहे.
सर्व भक्तांसाठी मराठी, राजस्थानी, गुजराती, उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय, बंगाली समाजाचे कलाकार कलेच्या माध्यमातून नवरात्रोत्सवात सांस्कृतिक आविष्कार सादर करणार आहेत. महिलांसाठीदेखील विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या वर्षी जेजुरी गडाचा देखावा साकारण्यात आला असून त्यात देवीच्या मूर्तीची स्थापना होणार आहे. या उत्सवासाठी शाडू मातीची ७ फूट उंचीची मूर्ती ठाण्यावरून आणण्यात आली आहे. बुधवारी सकाळी १० वाजता आमदार प्रताप सरनाईक यांच्या मंगल नगर येथील जनसंपर्क कार्यालयापासून देवीची भव्य मिरवणूक तसेच नववर्ष स्वागतयात्रा काढण्यात येणार आहे. मिरवणुकीत ढोलताशाचा गजर, लेझीम पथक व वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
२२ मार्चला सायंकाळी महिलांचे पारंपरिक नृत्य व सांस्कृतिक कार्यक्रम व हळदी-कुंकू समारंभ होईल. २३ मार्चला नृत्य स्पर्धा, २४ मार्चला भजन संध्या, २५ मार्चला काठियावाडी कसुम्बल डायरो २६ मार्चला भजन संध्या, २७ मार्च रोजी ‘आखाडा’ ही एकांकिका, नाट्य कलाकृती, २८ मार्चला महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम, २९ मार्च रोजी प्रीती टंडन यांची ‘माता कि चौकी’, ३० मार्चला रामनवमीनिमित्त ‘एक शाम राम लल्ला के नाम’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com