पर्यायी रस्त्यावरून आंदोलनाचा इशारा

पर्यायी रस्त्यावरून आंदोलनाचा इशारा

घणसोली, ता. २१ (बातमीदार)ः कोपरखैरणेतील मुख्य रस्त्यावरील वाहतूक कोंडीमुळे महापालिकेने सेक्टर १४ मधील महालक्ष्मी मंदिराकडे जाण्यासाठी पर्यायी रस्ता बनवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, पण या रस्त्यामुळे परिसरातील शांतता भंग होणार असल्याने कोपरखैरणे वेल्फेअर असोसिएशनने पालिकेविरोधात आंदोलनाचा पावित्रा घेतला आहे.
कोपरखैरणे सेक्टर १४ मधील अंतर्गत रस्ते अतिशय अरुंद आहेत. त्यामुळे रस्त्याच्या एका किंवा दोन्ही बाजूला वाहने उभी केल्यास वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे महापालिकेने सेक्टर १४ मधील महालक्ष्मी मंदिराकडे जाण्यासाठी पर्यायी रस्ता बनवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, पण या रस्त्यामुळे या परिसरातील शांतता तसेच शाळा परिसराची सुरक्षा धोक्यात येणार असल्याने पालिकेच्या निर्णयाला स्थानिक रहिवाशांकडून विरोध केला जात आहे. यासाठी सेक्टर १४ मधील रहिवाशांनी महापालिकेविरोधात स्वाक्षरी मोहीम हाती घेतली आहे. तसेच पालिकेने पर्यायी रस्ता बांधण्याचा निर्णय स्थगित केला नाही तर वेळप्रसंगी रस्त्यावर उतरण्याचा इशारा महापालिकेला दिला आहे.
-------------------------------
रहिवाशांच्या विरोधाची कारणे ः
- पर्यायी मार्गामुळे या परिसरातील नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागेल, असा दावा केला जात आहे. यात रात्री-अपरात्री भटकणाऱ्यांसोबत वाढत्या रहदारी, प्रदूषणामुळे त्याचा परिणाम ज्येष्ठ नागरिकांवर होणार आहे.
- अनेक जुन्या सोसायट्यांमध्ये कार पार्किंगची व्यवस्था नाही. त्यांची वाहने रस्त्यावरच उभी असतात. या मार्गामुळे आधीच अरुंद असलेला रस्ता अवजड वाहतुकीसाठी वापरला जाईल. त्यामुळे मंदिराच्या बाहेरील मोकळ्या जागेचा सांस्कृतिक कार्यक्रमासाठी होणारा वापर बंद होईल, अशी भीती रहिवाशांना वाटत आहे.
-------------------------------------------
कोपरखैरणे सेक्टर १४ येथील मुख्य रस्त्यालगत नाल्यावरून महालक्ष्मी मंदिराकडे नव्याने तयार करण्यात येणाऱ्या रस्त्याला नागरिकांचा तीव्र विरोध आहे. याबाबतचा जाहीर विरोध वेळोवेळी केला आहे. तसेच वेळ पडल्यास रस्त्यावरही उतरणार आहे.
- अविनाश वासुदेवन, सचिव, रेसिडेन्ट वेल्फेअर असोसिएशन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com