विरारमध्ये शोभा यात्रेची जय्यत तयारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विरारमध्ये शोभा यात्रेची जय्यत तयारी
विरारमध्ये शोभा यात्रेची जय्यत तयारी

विरारमध्ये शोभा यात्रेची जय्यत तयारी

sakal_logo
By

विरार, ता. २१ (बातमीदार) : मनवेल पाडा विभागात गेली १३ वर्षे मराठी नववर्ष गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रेचे आयोजन करण्यात येत आहे. ही शोभायात्रा बहुजन विकास आघाडी जनसंपर्क कार्यालय, क्रिस बेकरी समोर मनवेल पाडा तलाव येथून बुधवारी दुपारी ४ वाजता गुढी उभारून मराठी नववर्ष गुढीपाडवा शोभायात्रेस सुरुवात करण्यात येणार आहे. या शोभायात्रेमध्ये बँड पथक, लेझीम पथक, ढोल-ताशा पथक, सामाजिक, धार्मिक, ऐतिहासिक संदेश देणारे देखावे, वारकरी दिंडी, पारंपरिक वेशभूषासह हजारो नागरिक महिला मुले सहभागी होणार आहेत; तर विरार पश्चिमेला विठ्ठलनाथ संस्थानच्या वतीने शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही शोभायात्रा विठ्ठल मंदिरजवळून सुरू होऊन मंगलमूर्ती मंदिरापर्यंत जाणार आहे. चंदनसार आणि फुलपाडा येथेही बहुजन विकास आघाडीतर्फे नववर्ष स्वागतयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
===
वसई-विरारसह मिरा-भाईंदर मध्ये २० ठिकाणी शोभा यात्रा
गुढीपाडवानिमित्त मिरा-भाईंदर, वसई विरार पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये पाच मिरवणुका, ११ शोभायात्रा, चार स्वागतयात्रा अशा एकूण २० मिरवणुकीचे नियोजन करण्यात आले आहे. भाईंदर पूर्वला नवघर पोलिस ठाण्याच्या हद्दीत २ ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विरारमध्ये एका ठिकाणी पूजेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पोलिस आयुक्तलयाकडून देण्यात आली आहे.