Sun, June 4, 2023

मच्छीमार, शेतकऱ्यांचे नुकसान
मच्छीमार, शेतकऱ्यांचे नुकसान
Published on : 21 March 2023, 12:28 pm
पालघर, ता. २१ (बातमीदार) : पालघर तालुक्यात मंगळवारी (ता. २१) पहाटे अवकाळी पाऊस कोसळल्याने शेतकरी, मच्छीमार, वीटभट्टी, गवत व्यापारी यांची एकच तारांबळ उडाली. अचानक पहाटे एक तास जोरदार पाऊस कोसळल्यामुळे काही ठिकाणी रस्त्यावरही पाणी साचले होते. अवकाळी पावसामुळे शेतकरी भाजीपाला उत्पादक व मच्छीमार यांचे मोठे नुकसान झाले आहे. पालघर तालुक्यात मंगळवारी पहाटे एका तासभरात काही ठिकाणी पाणी साचले होते. पहाटे पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांना पावली गवताचे पावसापासून संरक्षण करता आले नाही. त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. अचानक पाऊस पडल्याने वीटभट्टीचे मोठे नुकसान झाले; तर मच्छीमार आणि समुद्रकिनाऱ्यावर सुकत टाकलेली मच्छी पावसाने भिजून खराब झाली आहे. पावसामुळे भाजीपाला, फळबाग, आंबा मोहोर व फळगळतीही झाली आहे.