पनवेलमध्ये भाजी विक्रेत्यांना मारहाण

पनवेलमध्ये भाजी विक्रेत्यांना मारहाण

खारघर, ता. २१ (बातमीदार) : पनवेलमधील वारदोली गावालगत लेबर कॉलनी येथे भाजी विक्री करणाऱ्या राम गोपाळ पाटील (वय ५४) यास तिघा अज्ञात मद्यपींनी मारहाण करून त्यांचे हात-पाय बांधून पळून गेल्याची घटना सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. याप्रकरणी पनवेल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पाटील यांच्यावर पनवेलमधील एका रुग्णालयात उपचार सुरू आहे. पनवेलमधील वारदोली गावालगत वाधवा कन्स्ट्रक्शन लेबर कॉलनी येथे राम पाटील हे भाजीविक्री करतात. गत सोमवारी सायंकाळी जसवंत रॉय यांच्याकडे काम करणाऱ्या तीन अनोळखी इसमांनी मद्याच्या नशेत पाटील यांच्या छातीवर, डोक्यावर मारहाण करून त्यांना गंभीर जखमी करत एका पत्र्याच्या खोलीत नेत हात-पाय बांधून तिथून पळून काढला. दरम्यान, काही वेळाने पाटील यांच्या नातेवाईकांना ही माहिती मिळाल्यावर त्यास पनवेलमधील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याविषयी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com