गझल, बासरी वादनाने फेस्टिव्हलची सांगता

गझल, बासरी वादनाने फेस्टिव्हलची सांगता

अंबरनाथ, ता. २२ (बातमीदार) : जगवि‍ख्यात बासरीवादक राकेश चौरासिया आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उत्कृष्ट सादरीकरण करत तसेच सुप्रसिद्ध गझलगायक पंकज उदास यांच्या गायनाने अंबरनाथ शिवमंदिर आर्ट फेस्टिवल २०२३ ची सांगता संगीतमय वातावरणात झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या यंदाच्या शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हलला पहिल्या दिवसापासूनच रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिर परिसराच्या प्रांगणात १६ ते २० मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हलला लाखो कलारसिकांनी भेट देत कार्यक्रमाचा आनंद घेतला.
मराठमोळा अभिनेता शिव ठाकरे याने ही महोत्सवाला हजेरी लावत उपस्थित प्रेक्षकांशी संवाद साधला. या वेळी राज्याचे बंदर आणि खनिकर्म मंत्री दादा भुसे, शिक्षणमंत्री उदय सामंत, आमदार प्रताप सरनाईक, अतिरिक्त पोलिस आयुक्त पंजाबराव उगले, शासकीय मध्यवर्ती ग्रंथालयाचे प्रमुख श्याम जोशी आणि अर्चना कर्णिक आदींचा या वेळी सत्कार करण्यात आला.

------------------
चिठ्ठी आयी हैं..., ना कजरे की धार...
चौरसिया यांचे बासरीवादन आणि त्यांना तबल्यावर साथ देणारे तबलावादक यांची सुरिली जुगलबंदी रंगली. याच पद्धतीने विविध वाद्यांबरोबर राकेश चौरासिया यांच्या बासरीवादनाची जुगलबंदी रंगली. राकेश चौरासिया यांनी ‘कॅच मी इफ यू कॅन’ धून सादर केली. गझलगायक पंकज उदास यांनी ‘आप जिनके करीब होते हैं, वो बडे खुशनसीब होते है’ ही सदाबहार गझल गात संगीत मैफलीची सुरुवात केली. ‘निकलो ना बेनकाब जमाना खराब है’, ‘जीए तो जीए कैसे बिन आपके’, ‘अरे अहिस्ता किजिये बाते’, ‘चांदी जैसा रंग हैं तेरा’, ‘आईए बरिशो का मोसम आया हैं’ यांसारख्या गझल सादर केल्या. ‘चिठ्ठी आयी हैं वतन से चिठ्ठी आयी हैं’ गीताला रसिकांची दाद मिळाली. यानंतर ‘ना कजरे की धार ना मोतीयो का हार, ‘आज फिर तुमपे प्यार आया हैं’, ‘घुंगरू तूट गये’ या सदाबहार गाण्यांनी संगीत मैफलीची सांगता केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com