तनिष्काचा वर्धापन दिन साजरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तनिष्काचा वर्धापन दिन साजरा
तनिष्काचा वर्धापन दिन साजरा

तनिष्काचा वर्धापन दिन साजरा

sakal_logo
By

घाटकोपर, ता. २१ (बातमीदार) ः ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या तनिष्का व्यासपीठाच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त राज्यात विविध ठिकाणी महिलांसाठी उपक्रम राबवण्यात आले. उपनगरातील घाटकोपर विभागातील असल्फा येथील गणेश कमिटी शांतीनगर येथे मंगळवारी (ता. २१) सांस्कृतिक उपक्रम साजरे करत गुढी उभारण्यात आली. गुढीपाडव्यानिमित्त तनिष्काच्या महिलांनी पालेभाज्यांची संकल्पना आखून गुढी उभी करत महिलांनी पोषक आहाराचा संदेश दिला. या वेळी उपस्थित महिलांसह तनिष्का सदस्यांनी केक कापून वर्धापन दिन साजरा केला.

‘सकाळ’ माध्यम समूहाने महिलांसाठी उपलब्ध करून दिलेल्या तनिष्का व्यासपीठ माध्यमाचा दहावा वर्धापन दिवस सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात येत आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या स्मिता माने यांच्या वतीने बचत गटातील महिलांना स्वावलंबी कसे बनावे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. आज सकाळपासून महिलांसाठी विविध खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.

तनिष्काच्या सदस्य पद्मा मलवलकर यांच्या वतीने घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाला तनिष्काच्या मुंबई प्रमुख प्रथमा शिरोडकर, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या स्मिता माने, सत्कर्म फाऊंडेशनचे संचालक दत्तात्रय सावंत, छाया सूर्यवंशी, उषा धुमाळ, तनिष्काच्या रेणुका साळुंखे, गीता चव्हाण, साक्षी सकपाळ, अंकिता सावंत, अरुणा साळुंखे, अनिता लांडगे, चंपावती लांडगे, ललिता जयराम, संचिता मानकर, प्रतिभा भालेराव, रोशनी चव्हाण, संध्या गंगावणे, चंदा आत्करी, उद्योजिका मनीषा निर्मळ आदी उपस्थित होते.