पालिकेच्या सफाई कामगारांचा २३ मार्चला मोर्चा

पालिकेच्या सफाई कामगारांचा २३ मार्चला मोर्चा

मुंबई, ता. २१ ः महापालिकेच्या सफाई कामगारांना मालकी हक्काने घरे, शासनाच्या जाचक अटीतून वगळावे, ठेकेदारी प्रथा बंद करावी आदी मागण्यांसाठी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या वतीने येत्या २३ मार्च रोजी आझाद मैदानावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. कामगारांचे प्रश्न पालिका प्रशासनाने तसेच राज्य सरकारने सोडवले नाहीत, तर निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा मजदूर काँग्रेसचे अध्यक्ष गोविंदभाई परमार यांनी दिला आहे.
पालिकेमध्ये राबवण्यात येणाऱ्या आश्रय योजनेमध्ये १९८६ ते १९८८ नुसार मालकी हक्काने घरे देण्याचा शासनाचा आदेश त्वरित काढण्यात यावा, सामान्य प्रशासन विभागाच्या २८ मार्च २००५ रोजीच्या तसेच २४ फेब्रुवारी २०१९ च्या आदेशामधून सफाई कामगारांना वगळण्यात यावे, सर्वोच्च न्यायालयाच्या १९९५ च्या निर्णयानुसार सफाई कामात ठेकेदारी प्रथा बंद करावी, असंघटित सफाई कामगारांसाठी माथाडी कामगार बोर्डाच्या धर्तीवर महर्षी वाल्मीकी असंघटित सफाई कामगार बोर्ड तयार करावे, केंद्र सरकारच्या वित्त निगमच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने महर्षी वाल्मीकी आर्थिक विकास महामंडळ सुरू करावे, सफाई कामगारांना जाती प्रमाणपत्रासाठी १९५० च्या वास्तव्याची अट रद्द करून ९ सप्टेंबर २००४ च्या शासन निर्णयानुसार १९६० च्या वास्तव्याच्या पुराव्याच्या आधारे जाती प्रमाणपत्र देण्याचा आदेश काढावा, तसेच जुनी पेन्शन योजना त्वरित लागू करावी आदी मागण्यांसाठी आझाद मैदानात २३ मार्च रोजी जनआक्रोश मोर्चा काढणार असल्याची माहिती परमार यांनी दिली. मागण्या मान्य न झाल्यास राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चा काढण्याचा तसेच आगामी सर्व सार्वत्रिक निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com