अवकाळी पावसाचा मध्य रेल्वेला फटका

अवकाळी पावसाचा मध्य रेल्वेला फटका

मुंबई, ता. २१ : मुंबईसह परिसरात मंगळवारी पहाटेपासून सुरू झालेल्या पावसामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीला मोठा फटका बसला. त्यामुळे मुख्य मार्गावरील आणि हार्बर मार्गावरील लोकलचे वेळापत्रक कोलमडले होते. पावसामुळे अनेक लोकल दिवसभर विलंबाने धावत होत्या. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.
गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने जोर धरला आहे. मंगळवारी पहाटेपासून मुंबई, ठाणे, नवी मुंबईत अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे उपनगरीय रेल्वेला चांगलाच फटका बसत आहे. तुरळक कोसळणाऱ्या सरींमुळे आणि पावसामुळे हवेतील दृश्‍यमानता कमी झाल्याने लोकलचा वेग मंदावला. त्याचा फटका लोकलच्या वेळापत्रकावर झाला.
---
‘हार्बर’ विस्कळित
हार्बर मार्गावर सकाळी ८.१५ वाजण्याच्या सुमारास नेरूळ ते जुईनगरदरम्यान वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे लोकल सेवा १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होती. दरम्यान, अवकाळी पाऊस सुरू झाला असला, तरीही लोकल सेवा सुरळीत सुरू असल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com