वाकोल्यात पश्चिम द्रुतगती महामार्गावर अपघात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाकोल्यात पश्चिम द्रुतगती महामार्गावर अपघात
वाकोल्यात पश्चिम द्रुतगती महामार्गावर अपघात

वाकोल्यात पश्चिम द्रुतगती महामार्गावर अपघात

sakal_logo
By

मुंबई, ता. २१ : मुंबईतील पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाकोला परिसरात मंगळवारी सकाळी वाहनांची धडक लागून अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातामुळे पश्चिम द्रुतगती मार्गावर मंगळवारी सकाळी काही काळ वाहतूक मंदावली. पावसामुळे झालेल्या गोंधळात या अपघातामुळे पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीत भर पडली.
वाकोला पुलावर चार ते पाच वाहने मंगळवारी सकाळी एकमेकांवर आदळल्याने हा अपघात झाला. रस्त्यावर तेल सांडल्याने अनेक वाहने घसरल्याने हा अपघात झाला. या अपघातात चार जण जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर जवळील रुग्णालयात उपचार सुरू आहे.