Thur, June 1, 2023

भाजपला हव्यात एकत्र निवडणुका?
भाजपला हव्यात एकत्र निवडणुका?
Published on : 21 March 2023, 3:41 am
सकाळ न्यूज नेटवर्क
मुंबई, ता. २१ ः लोकसभेच्या निवडणुका आगामी दीड वर्षात होणार असून त्यासाठी भाजपकडून तयारी सुरू झाली आहे. नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेच्या आधारावरच भाजप लोकसभेच्या निवडणुकांना सामोरे जाणार आहे. त्याच वेळी विधानसभेच्या निवडणुका झाल्यास लाभ होईल, असे भाजपच्या एका गटाला वाटते; मात्र १९९९ साली लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र झाल्या होत्या. त्या वेळी लोकसभेपेक्षा विधानसभेत भाजपला तब्बल सात टक्के मते कमी मिळाली होती. त्यामुळे आता पुन्हा तोच प्रकार नको, अशी भीती दुसऱ्या गटाला वाटते. यासंबंधात योग्य वेळी योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे पक्षातर्फे सांगण्यात आले.