Tue, June 6, 2023

२६ मार्चला राज्यभरात
पोलिस भरतीची लेखी परीक्षा
२६ मार्चला राज्यभरात पोलिस भरतीची लेखी परीक्षा
Published on : 21 March 2023, 6:07 am
मुंबई, ता. २१ : मैदानी परीक्षा झाल्यानंतर तब्बल अडीच महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर पोलिस भरतीसाठी लेखी परीक्षेची तारीख जाहीर झाली आहे. पोलिस शिपाई आणि वाहन चालक पदासाठी २६ मार्चला मुंबई वगळता लेखी परीक्षा होणार असल्याची माहिती पोलिस महासंचालक संजय कुमार यांनी दिली. लेखी परीक्षा ही १०० गुणांची असून त्यास ९० मिनिटांचा वेळ दिला जाणार आहे. तसेच ही परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपाची असणार आहे. ही परीक्षा सुरळीत पार पडावी, यासाठी परीक्षा केंद्र ही सीसी-टीव्हीची सुविधा असलेल्या केंद्रावर घेण्यात येणार आहे. दरम्यान, लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवारांना महा-आयटीकडून हॉल तिकीट उपलब्ध केले जाणार असल्याचेही सांगण्यात आले.