एसटी कर्मचाऱ्यांसाठी नवे गणवेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एसटी कर्मचाऱ्यांसाठी नवे गणवेश
एसटी कर्मचाऱ्यांसाठी नवे गणवेश

एसटी कर्मचाऱ्यांसाठी नवे गणवेश

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : ः एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना पारंपरिक गणवेश देण्यासाठी निविदा काढण्यात आली आहे. चालक, वाहक आणि पर्यवेक्षकांना खाकी रंगाचा; तर मेकॅनिक यांना निळ्या रंगाचा गणवेश देण्यात येणार आहे. कर्मचाऱ्यांना तयार गणवेश आणि ५०० रुपये भत्ता देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. २३ मार्च रोजी अंतिम निविदा प्रक्रिया पार पडणार आहे.

माजी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या कार्यकाळात एसटीच्या चालक, वाहक, यांत्रिकी कर्मचारी, पर्यवेक्षक यांचा गणवेश बदलण्याची योजना आखण्यात आली होती. त्यानुसार त्यांनी नवी मुंबई येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी या संस्थेशी करार करून त्यांच्यामार्फत कर्मचाऱ्यांच्या गणवेशाचे डिझाईन बनवले होते. मात्र, रंगीबेरंगी गणवेश असल्याने कर्मचाऱ्यांनी ते गणवेश नाकारले होते. एसटी कर्मचाऱ्यांकडून गणवेशाला विरोध दर्शवण्यात आला होता; तर एसटी महिला कर्मचाऱ्यांनीसुद्धा ‘अपनी खाकी नहीं दुंगी’ असा उपक्रम हाती घेतला होता. अखेर एसटी महामंडळाने एसटी कर्मचाऱ्यांच्या भावना लक्षात घेता पारंपरिक गणवेशालाच मंजुरी दिली आहे. त्यामुळे एसटी महामंडळातील १३ संवर्गातील सुमारे ७० हजार कर्मचाऱ्यांना लवकरच नवीन गणवेश दिला जाणार आहे.