‘अशीही एक झुंज’ला विज्ञान परिषदेचा पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘अशीही एक झुंज’ला विज्ञान परिषदेचा पुरस्कार
‘अशीही एक झुंज’ला विज्ञान परिषदेचा पुरस्कार

‘अशीही एक झुंज’ला विज्ञान परिषदेचा पुरस्कार

sakal_logo
By

मुंबई, ता. २२ ः प्रा. मृदुला बेळे लिखित ‘अशीही एक झुंज’ (राजहंस प्रकाशन, पुणे) या पुस्तकाला विज्ञान लेखक संघाचा विज्ञानविषयक उत्तम पुस्तकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. एक हजार रुपये व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. हा पुरस्कार मराठी विज्ञान परिषदेतर्फे दरवर्षी दिला जातो. परिषदेच्या ५७ व्या वर्धापन दिनानिमित्त ३० एप्रिल रोजी हा पुरस्कार प्रदान केला जाईल.
या पुरस्कार निवडीसाठी प्रा. भालचंद्र भणगे, मृणालिनी साठे आणि विजय लाळे यांच्या समितीने परीक्षण केले. पुरस्कारासाठी जानेवारी ते डिसेंबर २०२२ या कालावधीत पुस्तके पात्र होती. यात एकूण १६ पुस्तके आली होती. त्यातील १४ पुस्तके पात्र ठरली होती.