सुरक्षा जवानाचा आयुक्तांकडून सत्कार

सुरक्षा जवानाचा आयुक्तांकडून सत्कार

भाईंदर, ता. २२ (बातमीदार) : मिरा रोड एस.के. स्टोन येथील मैदानात बागेश्वर धाम सरकार यांच्या दिव्यदर्शनाचा कार्यक्रम नुकताच पार पडला. या कार्यक्रमात अनेक महिलांच्या सोनसाखळ्या व मंगळसूत्र चोरण्याच्या घटना घडल्या आहेत. या कार्यक्रमाच्या सुरक्षा व्यवस्थेत कर्तव्य बजावत असताना महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान शिवाजी केदार यांना त्याठिकाणी सुमारे दोन लाख रुपयांची सोनसाखळी पडलेली आढळून आली. मात्र केदार यांनी प्रामाणिकपणे ही सोनसाखळी मिरा रोड पोलिस ठाण्यात जमा केली. शिवाजी केदार यांच्या कर्तव्यदक्षतेची व प्रामाणिकपणाची दखल घेऊन मिरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त दिलीप ढोले यांनी केदार यांचा सत्कार केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com