पालघर शहरातील अतिक्रमण नगरसेवकांनी हटविले

पालघर शहरातील अतिक्रमण नगरसेवकांनी हटविले

पालघर, ता. २२ (बातमीदार) : रेल्वे स्थानक ते मनोर व माहीम तथा सोनोपंत दांडेकर मार्गावर काही दुकानदार व व्यापारी हातगाडीवाले, भाजीविक्रेते यांनी रस्त्यावर अतिक्रमण केले होते. यामुळे वाहतूक कोंडीचाही मोठा प्रश्न निर्माण झाला होता. यासाठी नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत हे अतिक्रमण दूर करण्यासाठी अनेक वेळा चर्चाही झाली होती. त्यानंतर अतिक्रमण दूर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते, मात्र प्रशासन वेगवेगळी कारण सांगून कारवाई करत नव्हते. अखेर मंगळवार उपनगराध्यक्ष व इतर नगरसेवक रस्त्यावर उतरून सोबत नगरपालिकेचे कर्मचारी घेऊन अतिक्रमण दूर करण्यात आली अशीच मोहीम कायमस्वरूपी चालू ठेवावी अशी नागरिकाकडून मागणी होत आहे
पालघर शहर हे जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण आहे. येथे अनेक खेड्यापाड्यातून व शहरातून शेकडो लोक दररोज कामासाठी येत असतात. त्यातच शहरातील रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण करण्यात आले होते. तसेच माहीम रस्त्यावरील गॅरेजवाल्यांनी रस्त्याचा एक पूर्ण भाग दुचाकी ठेवण्यासाठी वापरला होता. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला होता. याबाबत अनेकदा तक्रार करूनही पालघर नगर परिषद या अतिक्रमणावर कारवाई करत नव्हती. त्यामुळे मंगळवारी उपनगराध्यक्ष उत्तम घरात, गटनेते कैलास म्हात्रे, नगरसेवक सुभाष पाटील, चंद्रशेखर वडे यांच्यासह मुख्य अधिकारी पंकज पवार पाटील यांनी पोलिस बंदोबस्तात ही सर्व अतिक्रमणे हटवली. ही मोहीम चार-पाच दिवस सुरू राहील. यानंतर पालिकेतर्फे अतिक्रमण पथक तयार करून अतिक्रमण दूर करण्यासाठी प्रयत्न केले जातील असे गट नेते कैलास म्हात्रे यांनी सांगितले
..
मासळी बाजारही हटवणार
पालघर शहरात रस्त्यावर काही व्यापारी दुकानदार फेरीवाल्यांनी अतिक्रमण केल्याने शहरात वाहतूक कोंडी वाढत आहे. त्यामुळे आम्ही अतिक्रमण दूर करण्यासाठी रस्त्यावर उतरलो. कारवाईदरम्यान लोकांची समजत घालून अतिक्रमण दूर करण्याची विनंती केली. यात काहींनी स्वतःहून अतिक्रमण दूर केले. ही मोहीम आम्ही काही दिवस अशी चालवणार आहोत. या मोहिमेनंतर मनोर रस्त्यावर बसणारा मासळी बाजार ही हटविला जाणार आहे, असे उप नगराध्यक्ष उत्तम घरात यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com