डहाणूत स्त्रीरंग महोत्सवाची रंगत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डहाणूत स्त्रीरंग महोत्सवाची रंगत
डहाणूत स्त्रीरंग महोत्सवाची रंगत

डहाणूत स्त्रीरंग महोत्सवाची रंगत

sakal_logo
By

डहाणू, ता. २२ (बातमीदार) : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने डहाणू आणि पालघर परिसरातील महिलांनी विविध क्षेत्रात केलेल्या उत्तुंग कार्याला प्रोत्साहन देण्यासह या सर्व स्त्रियांना एकत्र आणून त्यांच्या हितासाठी असणाऱ्या सरकारी योजनांची माहिती देण्यासाठी ‘स्रीरंग २०२३’ या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव २५ व २६ मार्च रोजी डहाणूच्या निसर्गरम्य समुद्रकिनारी होणार असून यात अधिकाधिक स्त्रियांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सहाय्यक जिल्हाधिकारी संजिता महापात्र यांनी पत्रकार परिषदेत केले. मंगळवार राज्य सरकार, डहाणू नगरपरिषद, तलासरी नगरपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेण्यात आली. यात सहाय्यक जिल्हाधिकारी संजिता महापात्र यांनी महिलांनी सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी तहसीलदार अभिजीत देशमुख, गटविकास अधिकारी पल्लवी सस्ते, नगरपरिषद मुख्याधिकारी तथा प्रशासक वैभव आवारे, शिशुपाल सिंग आदी उपस्थित होते. या महोत्सवात विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेणाऱ्या महिलांचा सन्मान केला जाणार आहे. तसेच महिलांच्या सबलीकरणासाठी शासकीय योजनांची माहिती दिली जाणार असून महिलांच्या न्याय्यहक्काबाबत आणि आरोग्य विषयक जनजागृती करणारे स्टॉल उभारले जाणार आहेत. या ठिकाणी महिलांसाठी विनामूल्य आरोग्य तपासणी केली जाणार असून विविध पदार्थांची विक्री करण्यासाठी महिलाबचत गटांकडून शंबर पेक्षा जास्त स्टॉल उभारले जाणार आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.