महिला प्रवाशांची ‘लालपरी’ला पसंती

महिला प्रवाशांची ‘लालपरी’ला पसंती

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २२ : राज्य सरकारच्‍या आदेशानुसार महिलांना तिकीटदरात ५० टक्के सवलतीची सवारी सुरू झाली. ठाणे जिल्ह्यातील महिलांनी लालपरीला पसंती दिली आहे. अवघ्या १७ ते १९ मार्च या तीन दिवसांत एसटीच्या ठाणे विभागातून जवळपास ७७ हजार महिलांनी प्रवास केला आहे. विशेष म्हणजे रविवारीही महिलांची एसटीमध्‍ये गर्दी पाहण्यास मिळाली आहे. तीन दिवसांच्‍या आकडेवारीवरून पहिल्या क्रमांकासाठी मुरबाड आणि भिवंडीतील महिला वर्गाची जणू स्पर्धा पाहण्यास मिळत आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागांतर्गत एकूण आठ आगार येतात. त्या आठ विभागांमध्ये गेल्या तीन दिवसात ७६,८५७ महिलांनी सवलतीचा लाभ घेतल्याचे दिसत आहे. १७ मार्च रोजी ठाणे जिल्ह्यात १३,४१९ महिलांना ५० टक्के सवलत देण्‍यात आली. मात्र, १८ मार्चला दिवसभराचा आकडा २९, ९१३ महिलांनी प्रवास केल्याने तो आकडा दुपटीहून अधिकने वाढला. परंतु, तिसऱ्या दिवशी रविवारीही प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या ही ३३, ५२५ वर पोहोचली होती. या दिवशीही महिलांनी लालपरीला पसंती दिल्याचे पाहण्यास मिळाले. या सवलतीचा पहिल्या तीन दिवसात शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील महिलांनी अधिक लाभ घेतल्याचे स्पष्ट झाले. या सवलतीमुळे तीन दिवसात ठाणे विभागाच्या तिजोरीत उत्पन्न रुपात १९ लाख ७६ हजार १७१ रुपयांची भरच पडली आहे.
---------------------------
उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद...
ठाणे एसटी विभागातील सर्वाधिक प्रवास करणाऱ्या मुरबाड आणि सर्वात कमी प्रवास करणाऱ्या कल्याण आगारातून शनिवारपेक्षा रविवारी महिलांची संख्या कमी झाल्याचे पाहण्यास मिळत आहे.

मुरबाडमध्ये शनिवारी ५ हजार ५१८ महिलांनी सवलतीचा लाभ घेतला. मात्र रविवारी ती संख्या ४ हजार १६१ वर आली. तर कल्याणमध्ये शनिवारी २ हजार ६०७ महिलांनी सवलतीचा लाभ घेतला. मात्र रविवारी ती संख्या २ हजार ५९८ वर आल्याचे दिसले.

शहापूर आगार वगळता इतर आगारात शनिवारपेक्षा रविवारी एक हजारांनी महिला प्रवासी संख्या वाढली. शहापूर अवघी ८ महिला प्रवासी संख्या वाढल्याचे दिसून आले.
....................................
चार आगारातून ११ हजारांहून अधिक महिलांचा प्रवास
आठ आगारांपैकी भिवंडी आणि मुरबाड या आगारात पहिल्या क्रमांकासाठी स्पर्धा दिसली. सर्वाधिक १२ हजार ५७५ महिलांनी नव्या सवलतीनुसार प्रवास केला. त्या पाठोपाठ भिवंडी १२ हजार ४२७, ठाणे (१) ११ हजार ८५८ आणि शहापूर ११ हजार ५९५ महिलांनी लाभ घेतला आहे.
........................
कल्याण आगार पिछाडीवर
जिल्ह्यातील कल्याण आगारातून प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या इतर आगरांपेक्षा सर्वात कमी आहे. ती संख्या ६ हजार १७४ इतकी आहे. वाडा ८ हजार ३५८, ठाणे (२) ७ हजार २८१ आणि विठ्ठलवाडी आगारातून ६ हजार ५९० महिला या सवलतीच्या लाभार्थी ठरल्या आहेत.
......................................

महिलांचा प्रवास
दिनांक ठाणे(१) / ठाणे(२) /भिवंडी /शहापूर/कल्याण/मुरबाड /विठ्ठल वाडी/ वाडा/ एकूण
१७ मार्च २००४/ ९८२/ २५४३/ १८२३/९६९/२८९७/१०४५/११४९/१३४१९
१८ मार्च ४१९३/ २७८६/ ४६१९/ ४८८२/ २६०७/५५१८/२२६२/३०४७/२९९१३
१९ मार्च ५६६१/३५००६/५२६५/ ४८९०/ २५९८/ ४१६१/ ३२८३/ ४१६१/३३५२५


--

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com