मसाज सेंटरवर पोलिसांचा छापा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मसाज सेंटरवर पोलिसांचा छापा
मसाज सेंटरवर पोलिसांचा छापा

मसाज सेंटरवर पोलिसांचा छापा

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. २२ (वार्ताहर) : मसाजच्या नावाखाली ग्राहकांशी अश्लील चाळे करणाऱ्या सीबीडी सेक्टर- १५ मधील स्पर्श स्पा या मसाज सेंटरवर पोलिसांनी सोमवारी (ता. २०) सायंकाळी छापा मारून चार महिलांसह स्पाच्या मालकाला ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे गेल्या तीन महिन्यांतील सीबीडी पोलिसांकडून मसाज पार्लरवर झालेली ही चौथी कारवाई आहे.
सीबीडी सेक्टर- १५ मधील प्रोग्रेसिव्ह लाऊंज इमारतीत असलेल्या स्पर्श स्पा या मसाज सेंटरमध्ये मसाजसाठी येणाऱ्या ग्राहकांकडून एक्स्ट्रा सर्व्हिसच्या नावाखाली अधिक पैसे घेऊन त्यांच्याशी अश्लील चाळे करण्यात येत असल्याची माहिती सीबीडी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार मसाज सेंटरवर बनावट ग्राहक पाठवून पोलिसांनी खातरजमा केल्यानंतर स्पावर छापा मारून मसाज पार्लर चालवणारा चेतन कुटे याच्यासह मसाजसाठी ठेवण्यात आलेल्या चार महिलांना ताब्यात घेतले आहे.
---------------------------------------
झालेल्या कारवाईंचा तपशील
सीबीडी सेक्टर- १५ मधील द मॅजिक मूव्हमेंट या स्पावर छापा मारून तीन महिलांना ताब्यात घेतले होते; तर जानेवारी महिन्यात सीबीडी सेक्टर- ११ मधील नुका वेलनेस व वेलनेस स्पा या दोन मसाज पार्लरवर छापा मारला होता. तसेच या दोन्ही मसाज पार्लरमधून ७ महिला व स्पाचालक अशा एकूण ८ जणांना ताब्यात घेतले होते. यापूर्वीदेखील सीबीडीत सुरू असलेल्या मसाज पार्लर व स्पावर सीबीडी पोलिसांनी तसेच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने कारवाई केली आहे.