Tue, May 30, 2023

गोरेगाव येथे शिस्तबद्ध मिरवणूक
गोरेगाव येथे शिस्तबद्ध मिरवणूक
Published on : 22 March 2023, 12:03 pm
मालाड, ता.२२ (बातमीदार) ः गोरेगाव पूर्व येथे मराठी नववर्षाची मिरवणूक अतिशय शिस्तबद्ध व डौलाने पार पडली. या मिरवणुकीत ढोल ताशे तसेच लेझीम पथक आणि हातात भगवे ध्वज घेऊन तरुणाई अतिशय उत्साहाने नाचत होती. मिरवणूक आरे चेक नाका, आरे रोड, जयप्रकाश नगर, पांडुरंग वाडी परिसरातून काढण्यात आली. अनेक युद्ध कौशल्य व कला मिरवणुकीचे आकर्षण होते. मिरवणुकीची सांगता पांडुरंग वाडी येथे मोठ्या उत्साहाने झाली. याप्रसंगी गोरेगाव पूर्वेतील मान्यवर नागरिक तसेच सामान्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.