वसुली एजंटला कर्जदाराची मारहाण

वसुली एजंटला कर्जदाराची मारहाण

पनवेल (वार्ताहर) ः कर्जाच्या वसुलीसाठी गेलेल्या एका वसुली एजंटला कर्जदारासोबत असलेल्या त्याच्या साथीदारांनी लाथाबुक्क्यांनी तसेच हेल्मेटने जबर मारहाण केली. कामोठेतील जवाहर इंडस्ट्रीजमध्ये हा प्रकार घडला असून मारहाणीत गंभीर जखमी असलेल्या वसुली एजंटवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
करंजाडे येथे राहणारे नरेन गायकवाड (वय ३७) बजाज फायनान्स कंपनीत वसुली विभागात काम करतात. नरेन आपल्या सहकाऱ्यासोबत कामोठे सेक्टर- ११ मध्ये राहणारा कर्जदार संकेत पाटील याच्याकडे दुपारी वसुलीसाठी गेला होता. या वेळी संकेत पाटील हा कामावर असल्याचे समजल्यानंतर दोघेही कामोठे येथील सीएनजी पेट्रोल पंपाच्या पाठीमागील कंपनीत त्याला भेटण्यासाठी गेले होते. त्याच्याकडे ७ हजारांच्या मासिक हप्त्याची मागणी केली असता संकेतने ४ हजार रुपये ऑनलाईन; तर उर्वरित ३ हजार रुपये सायंकाळी पाठवणार असल्याचे सांगितले. त्यानंतर दोघेही वसुली अधिकारी घरी जाण्यासाठी निघाले असता एका व्यक्तीने सीएनजी पंपाजवळ नेरनची मोटरसायकल अडवली. या व्यक्तीबरोबर असलेल्या सात ते आठ व्यक्तींनी नरेनला मारहाण करण्यास सुरुवात केली. याप्रकरणी कामोठे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com