Wed, June 7, 2023

बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईचा दणका
बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईचा दणका
Published on : 22 March 2023, 12:19 pm
वाशी (बातमीदार)ः रबाळे वाहतूक पोलिसांकडून वाहतूक सुरक्षा आणि नियमांचे पालन करण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्यानुसार वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या ३७२ वाहनांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करून त्यांच्याकडून ४५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली रबाळे वाहतूक शाखेकडून सोमवारी विशेष कारवाई करण्यात आली. या कारवाईत ३७२ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. हेल्मेट नसणाऱ्या २११ वाहनचालकांवर विशेष कारवाई करण्यात आली; तर नो पार्किंग, कर्णकर्कश आवाजाचे सायलेन्सर आणि इतर वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या ३७२ वाहनांवर कारवाई करण्यात आली.