Thur, June 8, 2023

दोन महिन्यात १२० गुन्हेगारांना अटक
दोन महिन्यात १२० गुन्हेगारांना अटक
Published on : 22 March 2023, 12:23 pm
मुंबई, ता. २२ : पश्चिम रेल्वेवर रेल्वे सुरक्षा बलाने (आरपीएफ) ऑपरेशन ‘यात्री सुरक्षा’ अंतर्गत स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने विविध गुन्ह्यांतील १२० गुन्हेगारांना अटक केली आहे. गेल्या दोन महिन्यांत ही कारवाई करून त्यांच्याकडून लाखो रुपयांचा चोरीला गेलेला माल जप्त केला आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरून दररोज २५ ते २७ लाख प्रवासी प्रवास करतात. रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ‘इनबिल्ट रिकिशन सिस्टम’सह (एफआरएस) ४८८ कॅमेरे, तीन हजार ८०२ सीसी टीव्ही कॅमेरे लावले आहेत. रेल्वे सुरक्षा बलाने जानेवारी ते फेब्रुवारी २०२३ या दोन महिन्यांत विविध १२० गुन्ह्यांचा छडा लावून आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून लाखो रुपयांचा चोरीचा माल जप्त केल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिली.