रेल्वेकडून तीन एक्सप्रेसच्या संरचनेत बदल

रेल्वेकडून तीन एक्सप्रेसच्या संरचनेत बदल

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २२ : मध्य रेल्वेने साईनगर शिर्डी - तिरुपती एक्स्प्रेस, अमरावती - तिरुपती एक्स्प्रेस आणि मुंबई - नांदेड एक्स्प्रेसच्या संरचनेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रेन क्र. १७४१८ साईनगर शिर्डी - तिरुपती एक्स्प्रेस आणि ट्रेन क्र. १७४१७ तिरुपती - साईनगर शिर्डी एक्स्प्रेस या दोन्ही गाड्यांना एक द्वितीय वातानुकूलित, चार तृतीय वातानुकूलित, १० शयनयान, ६ सामान्य द्वितीय श्रेणी (ज्यामध्ये २ गार्ड ब्रेक व्हॅन आणि एक पँट्री कार) अशी सुधारित संरचना असणार आहे.

ट्रेन क्र. १२७६६ अमरावती - तिरुपती एक्स्प्रेस २७ मार्चपासून आणि ट्रेन क्र. १२७६५ तिरुपती - अमरावती एक्स्प्रेस २५ मार्चपासून सुधारित संरचनेनुसार धावणार आहे. अमरावती - तिरुपती एक्स्प्रेसला एक द्वितीय वातानुकूलित, ३ तृतीय वातानुकूलित, ८ शयनयान, ५ सामान्य द्वितीय श्रेणी (ज्यामध्ये २ गार्ड्स ब्रेक व्हॅन) अशी सुधारित संरचना असणार आहे. ट्रेन क्र. ०७४२७ एलटीटी - हुजूर साहिब नांदेड एक्स्प्रेस आणि ट्रेन क्र. ०७४२६ हुजूर साहिब नांदेड - एलटीटी एक्स्प्रेस या दोन्ही गाड्यांना १२ तृतीय वातानुकूलित, ६ शयनयान, एक पँट्री कार आणि दोन जनरेटर कम लगेज ब्रेक व्हॅन अशा सुधारित संरचनेनुसार धावणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com