Wed, May 31, 2023

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
Published on : 22 March 2023, 12:29 pm
वाडा, ता. २२ (बातमीदार) : तालुक्यातील भावेघर येथे मंगळवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ट्रक दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. जमील अन्वर झुल्फार (वय ४४) असे मृताचे नाव असून मिळालेल्या माहितीनुसार जमील हा काल रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास कुडूसवरून खानिवलीच्या दिशेने घरी येत असताना भावेघर येथे गावातून एक ट्रक माती खाली करून मुख्य रस्त्यावर निघत असताना दुचाकी व ट्रक यांचा अपघात झाला. या अपघातात जमील याच्या पोटात, छातीत गंभीर दुखापत झाल्याने त्याला भिवंडी येथील सिराज रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले; मात्र उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला.