Sat, June 10, 2023

ठाण्यात शुक्रवारी पाणीपुरवठा राहणार बंद
ठाण्यात शुक्रवारी पाणीपुरवठा राहणार बंद
Published on : 22 March 2023, 12:37 pm
ठाणे, ता. २२ (वार्ताहर) : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या ठाण्यातील काही भागांमध्ये शुक्रवारी (ता. २४) दुपारी १२ ते शनिवारी (ता. २५) दुपारी १२ वाजेपर्यंत एमआयडीसी बारवी धरणाच्या अत्यावश्यक दुरुस्ती कामामुळे पाणीपुरवठा बंद राहणार आहे. ठाणे पालिका हद्दीत मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा मानपाडा व वागळे (काही भागात) प्रभाग समितीतील नागरिकांना एमआयडीसीद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. शुक्रवार दुपार ते शनिवार दुपारदरम्यान महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणीपुरवठाअंतर्गत नवीन टाकलेल्या बारवी गुरत्व वाहिन्या कार्यान्वित करण्याचे तातडीचे काम हाती घेतल्याने पाणीपुरवठा २४ तास बंद राहणार आहे.