महागाई भत्त्याचा फरक ३० दिवसांत द्या

महागाई भत्त्याचा फरक ३० दिवसांत द्या

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : एसटी कामगार संघटनेने यापूर्वीच वाढीव महागाई भत्ता व प्रलंबित फरक मिळण्यासाठी औद्योगिक न्यायालय, मुंबई येथे दावा दाखल केला आहे. या दाव्याची २० मार्च तारीख होती. दरम्यान यामध्ये आता संघटनेच्या वतीने शपथपत्र दाखल करण्यात आले आहे. ज्यामध्ये एसटी कामगारांना महागाई भत्त्याचा फरक ३० दिवसांत द्या; अन्यथा १८ टक्के व्याजदर मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

कामगार करारातील तरतुदीनुसार सदरची थकबाकी देय तारखेस देणे प्रशासनावर बंधनकारक असतानाही ती प्रशासनाकडून दिलेली नाही. त्यामुळे २० मार्च रोजी औद्योगिक न्यायालयात महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संघटनेने शपथपत्र सादर करून सन २०१८ पासून २०२१ पर्यंतची सर्व थकबाकी ३० दिवसांत देण्याची मागणी केली आहे. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना २८ टक्के, नंतर ३१ टक्के, ३४ टक्के व आता ३८ टक्के असा महागाई भत्ता लागू असून एसटी कर्मचाऱ्यांना मात्र नोव्हेंबर २०२२ पासून ३४ टक्केच महागाई भत्ता लागू केलेला आहे. या वाढीव महागाई भत्ता व थकबाकी एसटी कर्मचाऱ्यांना मिळण्याबाबत न्यायालयात प्रकरण दाखल आहे.

मूळ वेतनात पाच हजार, चार हजार व अडीच हजार वाढीमधील निर्माण झालेल्या तफावतीबाबतही स्वतंत्रपणे न्यायालयात जाणार आहे.
- संदीप शिंदे,
अध्यक्ष, एसटी कामगार संघटना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com