शोभायात्रांमुळे नवचैत्यनाचा संचार

शोभायात्रांमुळे नवचैत्यनाचा संचार

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता.२२ ः गुलाल उधळीत..ढोलताशांच्या आवाजात आणि तोंडी प्रभूरामचंद्राचा जयघोषाच्या स्वरात आज नवी मुंबई, पनवेल आणि उरण परिसरातील रस्ते उधळून गेले. नववारी, सहावारी रंगीत भरजरी साड्या, डोक्यावर भगवा फेटा असा अस्सल महाराष्ट्रीय बाज असलेला साजश्रृंगार करीत नटलेल्या महिला, तरुणी, विविध सामाजिक संदेश देणारे चित्ररथ, लाठ्याकाठ्यांची थरारक प्रात्यक्षिकांसह लक्षवेधक लेझीम पथकांमुळे वातावरणात नवचैत्यन्य आले.
पनवेल नववर्ष स्वागत समितीतर्फे आयोजित शोभायात्रेला सुमारे दीड हजार लोकांनी सहभाग नोंदवून नवीन वर्षाचे स्वागत केले. शहरातील वडाळे तलावापासून सुरु झालेल्या यात्रेत रामरथ, लेझीम पथक, ढोल, ध्वज पथक, विविध चित्ररथ, झांज पथक तसेच पारंपरीक वेषभूषा करून पनवेलकर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही शोभायात्रेला भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आणि आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती होती. १९९८ पासून ही परंपरा अविरत सुरु असून यंदा शोभायात्रेचे २४ वे वर्ष होते. पनवेल शहरातील वडाळे तलाव येथे गायत्रीमंत्राचे पठण करून शोभायात्रेला सुरुवात झाली. त्यानंतर श्री जाखमाता गावदेवी मंदिर, प्रभू आळी, जुने प्रांत ऑफिस, छत्रपती शिवाजी महाराज पथ, श्री विरुपाक्ष महादेव मंदिर, जय भारतनाका, लोकमान्य टिळक पथ असे मार्गक्रमण करत स्वातंत्र्यवीर सावरकर चौकात श्रीरामनामाच्या गजराने या शोभायात्रेची सांगता झाली.
-------------------------------
लाठीकाठीचे थरारक सादरीकरण
पनवेल महिला वकील वर्गाच्यावतीने बाईक रॅली, सिंधुदूर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघ, इनरव्हील क्लब ऑफ पनवेल आणि युवानेते केदार भगत व मित्र मंडळाच्यावतीने सरबताचे वाटप, रुधीरसेतूच्यावतीने रक्तदान हेच श्रेष्ठदान या संदर्भात जनजागृती तसेच विविध संस्था आणि मंडळांच्या वतीने पथनाट्य, लाठीकाठीचे सादरीकरण करुन लक्ष वेधून घेण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com