पर्यटन स्थळ म्हणून पाच किल्ल्यांचा विकास

पर्यटन स्थळ म्हणून पाच किल्ल्यांचा विकास

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ ः मुंबईतील किल्ले अतिक्रमणांच्या विळख्यात असून किल्ल्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या किल्ल्यांचे महापालिका आता जतन करणार असून मुंबईतील माहीम, वरळी, वांद्रे, सायन, शिवडी या पाच किल्ल्यांचा पर्यटनस्थळ म्हणून विकास केला जाणार आहे.
मुंबई बेटावर एकूण ११ किल्ले बांधण्यात आले. वांद्रे, माहीम, वरळी, काळा किल्ला, रिवा सायन टेकडी, शीव, शिवडी, माझगाव, डोंगरी, फोर्ट सेंट जॉर्ज आणि बॉम्बे फोर्ट. यांपैकी बॉम्बे फोर्ट, माझगाव आणि डोंगरी हे किल्ले होते. यातील बहुतांश किल्ल्यांचे अस्तित्वही आज राहिलेले नाही. काही किल्ल्यांचे आता फक्त अवशेष शिल्लक आहेत. यातील पाच किल्ल्यांचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. पर्यटनाच्या दृष्टीने हा विकास करण्याचे महापालिका प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी निविदा प्रक्रिया लवकरच राबवण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.
मुंबईतील माहीम किल्ल्याच्या भागात झालेल्या अतिक्रमणामुळे किल्ल्याची दुरवस्था झाली होती. ही बाब लक्षात घेऊन किल्ल्यावरील अतिक्रमण महापालिकेकडून हटवण्यात आले आहे. येथे २६७ झोपड्या वसल्या होत्या. यातील पात्र झोपडीधारकांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. किल्ल्यांचा जीर्णोधार प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. माहीम किल्ल्याची दुरुस्ती करून हा किल्ला पर्यटनस्थळ म्हणून खुला करण्यासाठी पुरातन सल्लागार विकास दिलावरी यांची नेमणूक करण्यात येणार आहे. या किल्ल्यापाठोपाठ माहीम, वरळी, वांद्रे, सायन, शिवडी या पाच किल्ल्यांचा विकास करण्यात येणार आहे. त्यासाठी येत्या एप्रिलमध्ये सल्लागार नेमले जाणार आहेत.
...
असा होणार विकास
किल्ला पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह आदी सुविधा पुरवण्यात येणार आहेत. किल्ल्याच्या परिसराची, डागडुजी, स्वच्छता, किल्ल्याचा परिसर सुशोभित करण्यात येणार आहे. पर्यटकांसाठी सर्व किल्ल्यांवर लेझर-शोची व्यवस्था करण्यात येणार आहे.
...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com