विलेपार्ल्यात लवकरच कलादालन

विलेपार्ल्यात लवकरच कलादालन

मुंबई, ता. २२ ः लोकमान्य सेवा संघाने आपली मराठमोळी संस्कृती, संस्कार, धर्म यांची जपणूक केली आहे. संस्कृती, संस्कार विसरता कामा नयेत, या ठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी होत असून त्यांची जपणूकही होत असल्याने पार्ले ही मुंबईची सांस्कृतिक राजधानी असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले. पार्ले येथे अत्याधुनिक कलादालन उभारण्याचा प्रयत्न करू, असेही ते म्हणाले.
विविध संस्थांना धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या परवानग्या मिळण्यात अडचणी येत आहेत. यासाठी कायद्यात बदल करून सर्व परवानग्या ऑनलाईन करू, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी या वेळी सांगितले. लोकमान्य सेवा संघाच्या शताब्दी सोहळ्याची सांगता व पार्ले येथील गुढीपाडव्याची हिंदू नववर्ष स्वागत स्फूर्तियात्रा कार्यक्रमात उपमुख्यमंत्री फडणवीस उपस्थित होते. या वेळी पर्यटनमंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, खासदार पूनम महाजन, आमदार आशीष शेलार, आमदार पराग आळवणी, माजी मंत्री विनोद तावडे, डॉ. दीपक सावंत, लोकमान्य सेवा संघाचे अध्यक्ष मुकुंद चितळे, डॉ. रश्मी फडणवीस यांच्यासह पार्लेवासीय उपस्थित होते. या वेळी फडणवीस यांच्या हस्ते मल्लखांब, जिम्नॅस्टिकमध्ये विजेत्या खेळाडूंचा सन्मान करण्यात आला.
...
फुलांचा वर्षाव
लोकसेवा सेवा संघाच्या स्मरणिकेचे प्रकाशन या वेळी मान्यवरांच्या हस्ते झाले. फडणवीस यांनी शोभायात्रेवर आणि सहभागी कलाकार, ढोल-ताशांवर फुलांचा वर्षाव केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com