माहीम पोलिस ॲक्शन मोडवर

माहीम पोलिस ॲक्शन मोडवर

मुंबई, ता. २२ : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्क मैदानात घेतलेल्या सभेत माहीममधील समुद्रात अवैध दर्गा बांधल्याचा मुद्दा उपस्थित केला. ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अल्टिमेटम देत महिनाभरात अनधिकृत बांधकाम हटवण्याची मागणी केली. या पार्श्वभूमीवर स्थानिक माहीम पोलिस ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. माहीम पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडू नये, यासाठी या भागात सुरक्षा वाढवण्याची तयारी सुरू केली असल्याची माहिती मिळत आहे. या परिसरात बॅरिकेटिंग करण्यात येणार आहे. पुढील परिस्थिती पाहता अतिरिक्त पोलिस बळ तैनात करण्यात येणार आहे. तसेच मगदूम शहा बाबा दर्ग्याजवळसुद्धा सुरक्षा वाढवण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com