
खासगी वाहनांची रस्त्यांवर अरेरावी
वाशी, ता. २३ (बातमीदार)ः ठाणे-बेलापूर मार्गावरील दोन्ही मार्गिंकावर रस्त्यांच्या कडेला खासगी कंपन्याची वाहने पार्क करण्यात येतात. या पार्किंगमुळे वाहतूक कोंडीत भर पडत असल्याने अपघातांची शक्यता वर्तवण्यात येत आहे; तर या वाहनांकडे वाहतूक पोलिसदेखील कानाडोळा करत असल्याने रस्त्यांवरील अरेरावी सुरू आहे.
ठाणे-बेलापूर मार्गावरील घणसोली येथे उड्डाणपुलावरचे काम झाल्यामुळे रबाळे येथे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. त्याचप्रमाणे भारत बिजली, ऐरोली रेल्वे स्टेशन, चिंचपाडा, दिघा, गणेश नगर, मुकुंद कंपनी या ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. ठाणे-बेलापूर रस्ता हा सहा पदरी करण्यात आला आहे. मात्र, या सहापदरी रस्त्याच्या कडेला खासगी कंपनीतील वाहनचालक, स्कूलबस चालक रस्त्याच्या कडेला दिवसभर पार्किंग करतात. त्याचप्रमाणे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकदेखील रात्रीच्या वेळेस वाहने पार्क करत असल्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडली आहे.
----------------------
५८ कोटींचा खर्च वाया
़ऐरोली येथील पटनी कंपनीसमोरील एमआयडीसीच्या भूखंडावर सुरू आहे. पालिकेने या रस्त्यासाठी ५८ कोटी रुपये खर्च केले आहेत. मात्र, या रस्त्याच्या दुतर्फा वाहनांचे बेकायदा पार्किंग करण्यात येत असल्याने वाहतूक कोंडीत भर पडली आहे.
-------------------------
रस्त्याच्याकडेला बेकायदा वाहने पार्क केल्यामुळे रस्ता अंरुद होत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीत आणखीच भर पडत आहे. त्यामुळे अशा वाहनचालकांवर कारवाई करण्यात येत आहे.
- गोपाल कोळी, पोलिस निरीक्षक, रबाळे वाहतूक शाखा