पालघरमध्ये ‘लघूस्वप्न -२०२३’ उत्साहात

पालघरमध्ये ‘लघूस्वप्न -२०२३’ उत्साहात

पालघर, ता. २३ (बातमीदार) : ‘सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाची शाश्वतता’ या विषयावर पालघर येथील सेंट जॉन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात ‘लघूस्वप्न -२०२३’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी ६० हून अधिक कंपन्यांनी त्यांच्या प्रतिनिधींद्वारे उपस्थिती नोंदविली होती. विद्यार्थी आणि समाजाच्या भल्यासाठी उद्योग आणि शैक्षणिक संस्था एकत्र येणे आवश्यक आहे, असे मत व्यक्त या वेळी मान्यवरांकडून व्यक्त करण्यात आले. या वेळी पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके व मुख्याधिकारी डॉ. पंकज पवार, कमला लाइफ सायन्सेसचे ग्रुप चेअरमन डॉ. डी. जे. झावर यांनी भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचे महत्त्व सांगितले.
या परिषदेत नियामक आणि लेखापरीक्षण या विषयावर सीए अरुण पीटर वाझ, मानव संसाधन या विषयावर प्रसिद्ध उद्योजक अॅलन कॅस्टेलिनो, बँकिंग आणि वित्त या विषयावर कर्नाटक बँकचे उपमहाव्यवस्थापक गोपालकृष्ण समगा यांच्यासह उद्योजक दिलीप शहा, उद्योगपती जयेश देधिया, जीव्हीएस कुमार यांनी मार्गदर्शन केले. या वेळी अनेक स्थानिक उद्योगांनी त्यांच्या शंका आणि समस्या चर्चेसाठी मांडल्या. त्यांना तज्ज्ञांच्या पॅनेलकडून वेगवेगळे सल्ले व मार्गदर्शन करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com