दिवा स्पेशल लोकलसाठी एल्गार मोर्चा

दिवा स्पेशल लोकलसाठी एल्गार मोर्चा

दिवा, ता. २३ (बातमीदार) : दिवेकरांसाठी दिवा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्पेशल लोकलसाठी आणि स्थानकाच्या समस्यांसाठी समाजसेवक अश्विनी केंद्रे व अमोल केंद्रे आक्रमक एल्गार मोर्चा काढला. दिव्यात २०१५ ला नागरिकांनी रेल रोको करून जलद गाडीला थांबा आणि दिवा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल सुरू करण्याची मागणी केली होती. दिव्यातील समाजसेवक अश्विनी केंद्रे व अमोल केंद्रे यासाठी आक्रमक होऊन एल्गार मोर्चा काढला. या वेळी दिवा रेल्वे स्थानकातील अनेक समस्यांसंदर्भात दिवा रेल्वे स्टेशनचे उपस्टेशन मास्तर कमलेश कनोजिया यांना निवेदन देण्यात आले.
दिव्यातील दातीवली रोड, विठ्ठल मंदिर ते दिवा पूर्व रेल्वे स्टेशन फाटकापर्यंत मोर्चा काढण्यात आला. दिवा रेल्वे स्थानकाचे उपस्टेशन मास्तर कमलेश कनौजिया यांनी दिवा येथून लवकरच लोकल सोडण्यात येणार आहे, याबाबत रेल्वे प्रशासन प्रयत्नशील आहे, सर्व जलद लोकल थांबण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. दिवा पूर्व रेल्वे तिकीट घर लवकरच चालू करण्यात येईल. तसेच आरक्षण खिडकीसह इतरही मागण्या रेल्वे प्रशासन अधिकारी लवकरात लवकर सोडवतील, असे त्या वेळी सांगितले. तसेच दोन महिन्यांत दखल घेऊन समस्या न सोडवल्यास छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मध्य रेल्वे प्रबंधक कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल आणि वेळ पडली तर रेल रोको आंदोलन करण्यात येईल, असे केंद्रे यांनी सांगितले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com